ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नांदुरघाट ग्रामपंचायतमध्ये नरेगा या योजनेत ग्रामरोजगार सेवक यांच्या बोगस सह्या मारून केला कोटी रूपयांचा भ्रष्टाचार !


नांदुरघाट ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी होणार का ?

केज : प्रतिनिधी 

राष्ट्रीय ते ग्राम पातळीवर प्रशासना मधील राक्षस आपले मोठे तोंड उघडून शासकिय योजनांचा बट्ट्याघोळ करताना दिसत आहे.ज्यांना जेवढे खायले मिळते ते त्या पध्दतीने ओरबडून घेतल्याचे दिसत आहे,भ्रष्टाचार कसा करायचा याचे आधुनिक प्रशिक्षण तर कार्यकत्यांना मिळत असावे असाच संशय व्यक्त केला तर हरकत नाही.ग्रामपंचायत पातळीवर भ्रष्टाचार कश्या प्रकारे केला जावू शकतो याचे आदर्श उदाहरण नांदुरघाट ग्रा.पं.मध्ये दिसून आलेले आहे.आणि या प्रकरणाची चौकशी आता एसआयटीमार्फत होण्याची गरज भासली आहे. दोन वर्षापूर्वी नांदूर घाट ग्रामपंचातची निवडणूक झाली व निवडणुकीत सत्ता पालट करण्यात विद्यमान ग्रामपंचायत पॅनल ला यश आले.मात्र सत्ता येतात,फक्त दोन वर्षे उलटली असतानाच ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.ग्रामपंचायत ने रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले “शेख सादिक” यांनी तीन ते चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्या परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार देण्यात आली होती.व तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की,२०२४-२०२५ मध्ये रोजगार हमी द्वारे जी कामे झाली आहेत त्या कामात बोगस बिले उचलण्यात आली आहे.या कामाच्या बाबतीत ग्रामसेवक व रोजगार सेवक यांची दिशाभूल करून बोगस सहा करण्यात आल्या असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.या एकूण कामात जवळपास मंजूर कामे ही चार ते पाच कोटीचे आहेत,पैकी जून ते जुलै २०२५ मध्ये एक कोटी ५४ लाख हे बोगस सह्या करून पैसे उचलले गेले आहेत.असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारी नंतर बीड जिल्हा परिषद मुख्यकारी अधिकारी यांनी पाच अधिकार्यांची चौकशी समिती स्थापन करून तात्काळ नांदूरघाट मध्ये झालेल्या सर्व कामाचे भ्रष्टाचार चे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.नंतर काल दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी बी डी ओ नागरगोजे यांच्या नियंत्रणा खाली समिती नांदूरघाट मध्ये दाखल झाली.दिवसभर झालेल्या सर्व कामाचे मोजमाप करण्यात आले.पांदण रस्ते दलीत वस्तीतील रस्ते, गावांतर्गत सिमेंट रस्ते असे अनेक कामे ही अर्धवट अवस्थेत तर कुठे रस्ता न करताच बिले उचलली आहेत असे प्रथम चित्र दिसत आहे.यात भ्रष्टाचाराचा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे.

•सीसीटीवी खरेदीत ग्रामपंचायत काम न करताच निधी हडपला ?

नांदूरघाट ग्रामपंचायत गावातील मुख्य रस्ते व चौका चौकात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ही लाखोंचा बिले उचलली आहेत.परंतु सी सी टी वी कॅमेरा कुठे ही बसविण्यात आलेला नाही. या सर्व कारभाराबाबत जनतेत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ग्रामपंचायत कारभारावर संभ्रम व रोष निर्माण झाला आहे.

•ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराचा मास्टर माईंड कोण आहे ते प्रशासनाने एस आय टी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. ग्रामंचायत ची बॉडी बरखास्त केली पाहिजे. अशी मागणी ग्रामस्थ मागणी आहे.


LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *