ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

परळी वैद्यनाथ मधील थर्मलच्या जागेत सोलार प्लांटला मंजुरी


आ. धनंजय मुंडेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला

परळी दि. २४ (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असून परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत ३५० मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला मेगा सोलर प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची ती मागणी मान्य करून लवकरच मेगा सोलर एनर्जी प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता. या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिल्या टप्यात ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाचतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.


LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *