महाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत ऊस वाहतूक वाहनचालकांसाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला


बीड प्रतिनिधी

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांच्या मार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता गंगा माऊली साखर कारखाना, केज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात ऊस वाहतूक करणारे वाहनचालक, बैलगाडी चालक तसेच साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना रस्त्यावरून ऊस वाहतूक करताना घ्यावयाची आवश्यक काळजी, अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच अपघात घडल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन कायद्यातील तरतुदी समजावून सांगत सामाजिक भान ठेवून सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले, ज्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच यावेळी ऊस वाहतूकदार वाहनचालकांना कायद्याचे व वाहतुकीचे नियम असलेली माहितीपत्रके व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना नियमांची सखोल माहिती मिळाली.

याप्रसंगी श्रीमती ऐश्वर्या कराड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई मुजावर साहेब कार्यकारी सांचालक, श्री. अविनाश अदनाक शेतकी अधिकारी तसेच श्री सिद्धेश्वर घुले, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व विशद करत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास गंगा माऊली साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री अण्णासाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जमादार साहेब तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि ऊस वाहतूकदार वाहनचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघातमुक्त रस्ते घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा कार्यक्रम जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक सकारात्मक संदेश देणारा ठरला.


LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *