महाराष्ट्रराजकीय

इन्स्पायर अकॅडमी बीडच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उज्वल यश –


बीड : प्रतिनिधी 

सनराईज एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा अहिल्यानगर येथे नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बीड येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत कुमारी संबोधी जोगदंड हिने चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. तसेच समीक्षा डोंगरे, स्वरा माने व चंद्रशेखर जाधव यांनी पहिला क्रमांक मिळवला. सम्यक जोगदंड व जयश काळे यांनी दुसरा क्रमांक, अन्वी काटकर हिने नववा क्रमांक, तर कृष्णा गोरे याने दहावा क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत राज्यभरातून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. इन्स्पायर अबॅकस क्लासेस, बीड येथील विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटांत बोटांवर आकडेमोड करून १०० हून अधिक गणिते सोडवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे अबॅकस शिक्षिका शिला जावळे मॅडम व अकांक्षा इंगोले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अकॅडमीच्या वतीने शिला जावळे मॅडम यांना ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

 


LOKVISHWAS

मुख्य संपादक:- अक्षय गिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *